‘विज्ञानशिक्षण म्हणजेच निसर्गविज्ञानांचे शिक्षण’ - म्हणजेच अधिकाधिक तथ्ये गोळा करण्याचे शिक्षण
विज्ञान एक ज्ञानशाखा नसून ती जगाकडे बघण्याची, ते समजून घेण्याची एक पद्धती आहे, हा विचार प्रत्यक्षात स्वीकारणे जड जाते. यामागे ‘व्यावसायिक असूया’ असावी का, असा मला कधीकधी प्रश्न पडतो. विज्ञानाचा एक पद्धती अथवा दृष्टीकोन असा अर्थ घेणे म्हणजे पुरेसा विवेकाधारित विचार करणाऱ्या कुणालाही वैज्ञानिक ज्ञानापर्यंत पोहोचता येईल, असे मानणे. अर्थातच यामुळे तज्ज्ञांची प्रतिष्ठा कुठेतरी कमी होणार.......